राज्याच्या मंत्रीमंडळातील निर्णय ‘एस्.एम्.एस्.’द्वारे नागरिकांपर्यंत पोचवणार !
मुंबई – राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये होणारे निर्णय अधिकाधिक जनतेपर्यंत पोचावेत, यासाठी यापुढे भ्रमणभाष संदेशाद्वारे हे निर्णय नागरिकांना पाठवण्यात येणार आहेत. यासाठी २३ कोटी ७८ लाख ८८ सहस्र रुपये संमत करण्यात आले आहेत. माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाद्वारे यासाठी निविदाप्रक्रिया राबवण्यात येणार आहे.