सांगली येथे २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्या धर्मांधाला अटक !
सांगली, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – मिरज तालुक्यातील एका गावात नवरात्रोत्सव मंडळातील देवीची आरती करून घरी निघालेल्या एका १३ आणि एका ६ वर्षीय, अशा २ अल्पवयीन मुलींना रस्त्यात थांबवून नदीम निहालउद्दीन (वय २८ वषे) याने स्वत:च्या भ्रमणभाषमधील अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी नदीम याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सुधारित बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम आणि ॲट्रॉसिटी कायद्यातील प्रावधानानुसार गुन्हा नोंद केला आहे. मुलींच्या नातेवाइकांनी संशयिताला जाब विचारल्यावर नदीम याने त्यांच्याशीही अरेरावी केली. (हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)