भिन्न धर्मीय प्रियकराला पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक !
नागरिकांकडून चोप !
वसई – भाईंदरच्या केबिन रोड परिसरात भिन्न धर्मीय प्रियकराला पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. या वेळी धार्मिक संघटनांसह मोठा जमाव जमला होता. तरुण आणि तरुणी भिन्न धर्मीय आहेत. कोण कुठल्या धर्माचे आहेत, ते कळू शकलेले नाही.
२४ वर्षीय तरुण प्रेमाच्या नावाखाली दुकानात पुढील दार बंद करून मागच्या दाराने अल्पवयीन प्रेयसीला बोलवत असे. याची कुणकुण स्थानिकांना लागली. नागरिकांनी या तरुणाला धरून चोप दिला. (नागरिक जागरूक आणि सतर्क झाले आहेत, हेच यावरून लक्षात येते ! – संपादक) जमावाने त्याला मारहाण करत त्याच्या दुकानाची तोडफोड केली. माजी आमदार नरेंद्र मेहता, आमदार गीता जैन हेही मध्यरात्री घटनास्थळी पोचले. तरुणी तक्रार देण्यास सिद्ध नव्हती; मात्र तिला समजावून सांगण्यात आले.