विवाहाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार करणार्या धर्मांधाला अटक !
सांगली, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – शालेय शिक्षणापासून असलेली ओळख आणि परिस्थिती यांचा लाभ घेऊन अन् विवाहाचे आमीष दाखवून एका हिंदु तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. (हिंदु तरुणींनो, असे किती दिवस धर्मांधाच्या कारस्थानाला फसणार आहात ? – संपादक) या प्रकरणी पोलिसांनी संशयित शाहिद इकबाल मुजावर या धर्मांधाला अटक केली आहे. शाहिद याने विवाहाचे आमीष दाखवून लॉज आणि वेगवेगळ्या कॅफेमध्ये येण्यास भाग पाडून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तरुणीची नग्न छायाचित्रे आणि व्हिडिओ काढून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित तरुणीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. (लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा केव्हा होणार ? – संपादक)