मुलीवर अत्याचार करणार्या तरुणाच्या घराची तोडफोड !
सांगलीतील लैंगिक अत्याचार झालेल्या सार्वजनिक शौचालयाचीही तोडफोड !
सांगली, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – शहरातील संजयनगर भागात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीच्या घराची जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अत्याचार झाला, त्या सार्वजनिक शौचालयाचीही संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड केली आहे. २८ वर्षीय तरुणाने ९ वर्षांच्या मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर संजयनगर भागातील नागरिक संतप्त झाले होते. संजयनगर पोलिसांनी आरोपी तरुणास अटक करत त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.