अकोला येथे पुन्हा दोन गटांत वाद !
अकोला – येथील हरिहर पेठेत पुन्हा एकदा दोन गटांत वाद झाला. त्यामुळे घटनेच्या ठिकाणी अकोला पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, तसेच दंगल नियंत्रण पथकही आले आहे. पोलिसांनी १७ जणांना कह्यात घेतले आहे. २ दिवसांपूर्वीच येथे मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती. वाहनांची जाळपोळही झाली होती.