कागल मतदारसंघात युवा चेहर्याला संधी दिली पाहिजे ! – वीरेंद्र मंडलिक, शिवसेना नेते
कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केले. या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र महायुतीचे काम केले नाही. कागल विधानसभेची जागा ही महायुतीमध्ये नैसर्गिकरित्या शिवसेनेकडेच आहे. येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीची जरी घोषणा केली असती, तरी महायुतीच्या माध्यमातून एकत्रितरित्या अद्याप अशी घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हसन मुश्रीफ यांना ‘तुम्ही आता थांबावे’, असे सांगण्याची वेळ आली असून नवीन युवा चेहर्याला संधी दिली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते आणि संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी केली आहे. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.