शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

आपणास जे कर्म करावयाचे आहे, जी कृती करावयाची आहे, जो व्यवसाय, जे अनुष्ठान आपण स्वीकारले आहे, ते त्याच्याविषयी सखोल ज्ञान न घेता, पुरेशी माहिती न मिळवता करत राहिलो, तर त्याच्यापासून काहीच लाभ होणार नाही. उलट काय करावे ?, कसे करावे ?, कशाकरता करावे ? हे सगळे ठाऊक आहे; पण प्रत्यक्ष कृती मात्र थोडीही केलेली नाही, तर हे ज्ञान कोरडे राहील, ते पांडित्य केवळ शाब्दिक राहील. ही हानी पुष्कळ मोठी आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘ईशावास्योपनिषद्’)