भगवंताचे नाम अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता घ्यावे !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

भगवंताचे नाम घेणे, हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते; पण केशर किती थोडे घालावे लागते ! तसे भगवंताच्या नामाचे आहे. प्रतिदिन थोडे; पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे, ते पुष्कळ काम करील.

भगवंत हा सर्वसत्ताधीश खरा; पण एका विषयामध्ये तो लुळापांगळा होतो आणि सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो; पण कमळात अडकतो, तीच स्थिती नामाविषयी भगवंताची होते.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज