Zameer Ahmed : (म्हणे) ‘अल्लाने मनात आणले, तर केंद्र सरकार कोसळेल !’
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मंत्री जमीर अहमद यांचे विधान
विजयपूर (कर्नाटक) – अल्लाने मनात आणले, तर केंद्रातील भाजप सरकार कोसळेल, असे विधान राज्याचे मंत्री जमीर अहमद यांनी येथे आयोजित ‘वक्फ अदालत’ कार्यक्रमामध्ये केले.
‘The BJP Government at the Centre will collapse if Allah wishes’ : Jameer Ahmed, Karnataka minister
“Allah stopped BJP at 240”
👉 There has been a BJP Government at the Centre for the last 10 years.
👉 No need to tell how it survived this long.
https://t.co/LIB9bQCU1p pic.twitter.com/XnYZI4DvId— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 11, 2024
अल्लाने भाजपला २४० वर थांबवले !
जमीर अहमद पुढे म्हणाले की, भाजप लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत होता; पण अल्लाने त्याला ४०० जागांपर्यंत पोचू दिले नाही. अल्लाने भाजपला २४० जागांवर थांबवले. अल्लाने ठरवले, काहीही होऊ शकते. भाजप सरकार वक्फ कायदा रहित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हेही अल्ला बघून घेईल, असेही ते म्हणाले.
सरकारी कार्यक्रमात शिष्टचाराचे उल्लंघन
सरकारी कार्यक्रम असूनही शिष्टाचाराचे पालन झाले नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. अल्पसंख्य, हज, वक्फ विभागाच्या कार्यक्रमात विजयपूर शहराचे भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे फलकांवर छायाचित्र नव्हते; मात्र विजयपूर जिल्ह्यातील इतर आमदारांचे छायाचित्र या फलकांवर होते.
संपादकीय भूमिकासध्यातरी गेली १० वर्षे केंद्रात भाजपचे सरकार अस्तित्वात आहे. ते कुणामुळे टिकले आहे, हे वेगळे सांगायला नको ! |