Bangladeshi Muslims Vandalised Durga Devi Idol : ढाका (बांगलादेश) : मुसलमानांनी केली दुर्गादेवीच्या मूर्तीची विटंबना !
हे छायाचित्र छापण्यामागे कुणाच्या धर्मभावना दुखावणे, हा हेतू नसून विटंबना लक्षात यावी, यासाठी हे छायाचित्र छापत आहोत. |
ढाका (बांगलादेश) – ८ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा बांगलादेशी सैन्य, जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि मदरशातील विद्यार्थी यांनी येथल एका दुर्गापूजा पंडालावर आक्रमण केले. ‘राजबारी बस ओनर्स असोसिएशन’ या संघटनेचा हा पंडाल असून त्यातील दुर्गादेवीच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली. ही घटना कळू नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने संपूर्ण पंडाल पडद्यांनी झाकले होते, अशी माहिती एका स्थानिक हिंदुत्वनिष्ठाने ‘सनातन प्रभात’ला दिली.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्माचा नायनाट होत असलेला बांगलादेश ! |