(म्‍हणे) ‘गणपति दारू प्‍यायला म्‍हणून शरद पवारांनी त्‍याचे विर्सजन केले !’ – राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर

राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उत्तम जानकर यांची हिंदुद्वेषी गरळओक

राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर

इंदापूर (जिल्‍हा पुणे) – बारामतीत बसवलेला दीड दिवसाचा गणपति दारू प्‍यायला म्‍हणून शरद पवारांनी त्‍याचे विसर्जन केले, असे वादग्रस्‍त विधान राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी केले. इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्‍या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तम जानकर यांनी या भाषणातून अप्रत्‍यक्षपणे अजित पवार आणि इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्‍यावर निशाणा साधला आहे; मात्र जानकरांचे वादग्रस्‍त विधान सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित होत असून यावर संतप्‍त प्रतिक्रिया उमटल्‍या आहेत. भाजपनेही उत्तम जानकर यांच्‍या विधानाचा आक्रमक समाचार घेतला आहे.

काय म्‍हणाले जानकर ?

अख्‍खा महाराष्‍ट्र ज्‍यांना सलाम घालतो, त्‍यांना घरातूनच आव्‍हान निर्माण केले गेले. सगळ्‍या महाराष्‍ट्रात याचे पडसाद उमटले. साहेबांनी (शरद पावार यांनी) बारामतीत दीड दिवसाचा गणपति बसवला होता. या गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती की, हा गणपति दूध प्‍यायचा म्‍हणून महाराष्‍ट्रभर बोलबाला झाला होता, मग एक दिवस बातमी आली हा गणपति दारू प्‍यायला, भ्रष्‍ट झाला म्‍हणून साहेबांनी दीड दिवसातच या गणपतीचे विसर्जन केले.

व्‍होट जिहादमुळे मिळणार्‍या आयत्‍या मतामुळे तुम्‍ही सोकावला ! – अजित चव्‍हाण, भाजप प्रवक्‍ते

भाजपचे प्रवक्‍ते अजित चव्‍हाण

भाजपचे प्रवक्‍ते अजित चव्‍हाण यांनी जानकरांच्‍या विधानाचा समाचार घेतला. ते म्‍हणाले की, उत्तम जानकर यांना जी भाषा कळते, त्‍याच भाषेत त्‍यांना उत्तर दिले पाहिजे. उत्तम जानकर यांना उलटे टांगून बदडले पाहिजे. हिंदूंच्‍या भावना इतक्‍या स्‍वस्‍त नाहीत, शरद पवारांच्‍या सभेतून वाट्टेल ते बरळणारे उत्तम जानकर या महाराष्‍ट्रात हिंदुत्‍वनिष्‍ठ जनता तुम्‍हाला चौकाचौकांत बडवेल. ‘व्‍होट जिहाद’मुळे मिळणार्‍या आयत्‍या मतांमुळे तुम्‍ही सोकावला. अट्टल दारूड्या आणि वाया गेलेल्‍या पुढार्‍याच्‍या अतिशय घाणेरड्या विधानाचा मी तीव्र शब्‍दांत निषेध करतो.

संपादकीय भूमिका

देवता, अवतार आदींच्‍या उच्‍चकोटीच्‍या कार्याविषयी काडीचेही ज्ञान नसणारेच अशी गरळओक करतात. ‘अन्‍य पंथियांमध्‍ये इतक्‍या खालच्‍या स्‍तराला जाऊन त्‍यांच्‍या श्रद्धास्‍थानांवर कुणी टीका केली, तर काय होते ?’, याची सर्वांना कल्‍पना आहे ! हिंदू निद्रिस्‍त असल्‍यामुळेच जानकर यांच्‍यासारख्‍यांचे फावले आहे. धर्मश्रद्धांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई न होणे हिंदूंना लज्‍जास्‍पद !