जुन्नरच्या घटनेच्या निषेधार्थ नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस ठाण्यात निवेदन अर्ज !
आतंकवादी हसन नसरुल्लाच्या समर्थनार्थ फलक लावल्याचे प्रकरण !
पुणे, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – जुन्नर या गावातील सय्यद वाडा परिसरात काही समाजकंटकांनी हसन नसरुल्ला या आतंकवाद्याच्या समर्थनार्थ फलक लावले होते. सकल हिंदु समाजाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस ठाण्यात निवेदन अर्ज देऊन हे फलक काढायला लावले.
अशा प्रकारचे फलक परत लागल्यास अशा आतंकवादाला बळ देणार्या प्रवृत्तींविरुद्ध तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली.