कल्याण येथे आईच्या सहमतीने मित्राकडून मुलीवर लैंगिक अत्याचार !
ठाणे, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – कल्याण येथील एक महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी ऋषिकेश येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथे महिलेचा (आई) मित्र आला होता. या तिघांनी ऋषिकेश भागात पर्यटन केले. यानंतर एका हॉटेलमधील निवासात मित्राने आपल्या मैत्रिणीच्या सहमतीने अल्पवयीन मुलीला पाण्यात गुंगीचे औषध टाकून दिले. मुलीला गुंगी आल्यानंतर तिचा अपलाभ घेत मित्राने मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
एप्रिल २०२२ ते २०२४ या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी पोलीस ठाणे येथे त्यांची पत्नी आणि तिच्या मित्रा विरुद्ध तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. हा सगळा प्रकार उत्तराखंड ऋषिकेश परिसरातील लक्ष्मण झुला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. त्यामुळे खडकपाडा पोलिसांनी गुन्ह्याची सर्व कागदपत्रे अधिकच्या अन्वेषणासाठी उत्तराखंड येथे पाठवली आहेत.
संपादकीय भूमिकाआई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ! |