मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांचे मुंबईत आगमन !

मालदीवचे राष्‍ट्रपती मुइज्‍जू

मुंबई – मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच्.ई.डी. महंमद मुइज्जू हे सपत्नीक भारताच्या दौर्‍यावर आले आहेत. ८ ऑक्टोबर या दिवशी दुपारी महंमद मुईज्जू यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.