धर्माचरणाची आवड असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची रत्नागिरी येथील कु. वेदाक्षी सुशील कदम (वय ५ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. वेदाक्षी सुशील कदम ही या पिढीतील एक आहे !
९.१०.२०२४ (आश्विन शुक्ल षष्ठी) या दिवशी रत्नागिरी येथील कु. वेदाक्षी सुशील कदम हिचा पाचवा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली वेदाक्षीची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘वर्ष २०१९ मध्ये ‘चि. वेदाक्षी सुशील कदम उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२९.९.२०२४) |
कु. वेदाक्षी कदम हिला पाचव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ |
१. साहाय्य करणे
‘वेदाक्षी मला घरकामांमध्ये साहाय्य करते. भाजी स्वच्छ करणे आणि धान्य निवडणे, या कामांतही ती मला साहाय्य करते. गुरुपौर्णिमा, तसेच सनातनच्या अन्य कार्यक्रमांत ती आजी समवेत सेवा करायला जाते.
२. धर्माचरण करण्याची आवड
वेदाक्षी शाळेत जातांना कुंकू लावते. हातात बांगड्या घालते आणि सात्त्विक कपडे घालून जाण्याचा आग्रह धरते.
३. मागील वर्षभरात ‘वेदाक्षीची आकलनक्षमता वाढली आहे’, असे मला जाणवते. तिच्यातील ‘प्रेमळपणा आणि सर्वांशी आदराने वागणे’, या गुणांतही वाढ झाली आहे.
४. राष्ट्रपुरुष आणि राष्ट्र यांप्रती अभिमान
शाळेत जातांना वेदाक्षी प्रतिदिन घरात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या छायाचित्राजवळ थांबते आणि स्वतःहून घोषणा देते. ती राष्ट्रध्वजाचा मान राखते. ‘राष्ट्रध्वजाच्या रंगासारखे कपडे घातल्यास ध्वजाचा अवमान होतो’, असे ती सांगते.
५. चुकांप्रती संवेदनशीलता
वेदाक्षी स्वतःकडून झालेल्या चुका लगेच सांगते आणि त्यासाठी क्षमा मागते. आम्ही तिच्या चुका लक्षात आणून दिल्यास ती चुका सुधारण्याचा प्रयत्न करते.
६. श्रीकृष्णाप्रती भाव
वेदाक्षीला दूरचित्रवाहिनी किंवा भ्रमणभाष यांवरील श्रीकृष्णाविषयीची चलत्चित्रे पहायला आवडतात. ‘मला राधा बनायचे आहे’, असे ती सांगते.
७. वेदाक्षीला होणारे आध्यात्मिक त्रास न्यून होणे
पूर्वी वेदाक्षी सारखी आजारी पडायची आणि बाहेरून घरी आल्यावर सारखी रडायची. देवाला प्रार्थना करणे, श्लोक आणि स्तोत्र पठण करणे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय, तसेच अन्य आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने आता तिचे त्रास न्यून झाले आहेत.
– सौ. श्रावणी सुशील कदम (कु. वेदाक्षीची आई), रत्नागिरी (११.७.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |