धनगर कार्यकर्त्यांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उड्या !
मुंबई – राज्यात धनगर आरक्षणाच्या समस्येवर तोडगा निघत नसल्याने धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात आंदोलन केले. या वेळी काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पाऊल उचलले आणि थेट मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उड्या मारल्या. या वेळी तेथे घोषणाही देण्यात आल्या.