कोल्हापूर येथे राष्ट्रसेविका समितीच्या वतीने संचलन आणि विजयादशमी उत्सव उत्साहात !
कोल्हापूर – देशभक्तीपर उत्साही वातावरणात राष्ट्रसेविका समितीचे संपूर्ण गणवेशात सघोष पथसंचलन उत्साहात पार पडले. प्रायव्हेट हायस्कूल येथून या संचलनाचा प्रारंभ झाला. शहरातील विविध भागांतून जाऊन पुन्हा प्रायव्हेट हायस्कूल येथे संचलनाची सांगता झाली. यानंतर तेथेच विजयादशमीचा उत्सव पार पडला. या वेळेस शस्त्रपूजन करण्यात आले. या उत्सवात मार्गदर्शन करण्यासाठी गडहिंग्लज येथील प्राध्यापक दत्ता देशपांडे हे उपस्थित होते. या वेळी कोल्हापूर विभाग संपर्कप्रमुख मेघा जोशी, केतकी प्रभुदेसाई, अनघा नाईक, गौरी मुजुमदार, अपर्णा कुलकर्णी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर शहर, इचलकरंजी, पन्हाळा अशा ठिकाणांहून १५० हून अधिक सेविकांचा सहभाग होता.