स्वामी विवेकानंद यांची बलाविषयीची शिकवण
आज आपल्याला आवश्यकता आहे असीम साहसाची, प्रचंड शक्तीची आणि अदम्य उत्साहाची ! जो प्रत्यक्ष कार्य करतो आणि ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, त्याच्याचपाशी लक्ष्मी जात असते. मागे वळून पाहू नका, पुढे पाऊल टाका, पुढे पुढे चला ! अनंत बल, अनंत उत्साह, अनंत धैर्य आणि अनंत धीर हेच आपल्याला हवी आहेत. हे असतील, तरच महान कार्ये संपादिता येतील.
– स्वामी विवेकानंद