मनाला आवर घालणे महत्त्वाचे !
मनाला स्वैर होऊ देऊ नये; पण त्यासह त्याला सातत्याने दडपूनही ठेवू नये. याचा विवेक संतांनी आपल्या वाड्मयातून स्पष्ट केला आहे. मन ही अमोघ शक्ती आहे; पण त्यामुळेच ती नियंत्रित नसली, तर ती निरुपयोगीच नव्हे, तर घातकही ठरते. त्याचे दुष्परिणाम माणसाला भोगावे लागतात. असे असल्याने ‘मन आवरले की, शोकाकुल होण्याचा प्रसंग येत नाही’, असे शास्त्रात सांगितले गेले आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)