श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची निवड !
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय !
पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील रासने यांची एकमताने निवड करण्यात आली. ४ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुढील २ वर्षांसाठी सुनील रासने यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर माजी अध्यक्ष माणिक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्टचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. सुनील रासने आणि ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री. महेश सूर्यवंशी यांना ‘सनातन पंचांग २०२५’ भेट !
श्री. सुनील रासने यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांच्या निवासस्थानी जाऊन ७ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीकडून त्यांना ‘सनातन पंचांग २०२५’ भेट देण्यात आले आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी सुवर्णयुग मंडळाचे पदाधिकारीही उपस्थित होते.
अन्य एका अनौपचारिक प्रसंगी ७ ऑक्टोबर या दिवशी श्री. महेश सूर्यवंशी यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराच्या कार्यालयात भेट घेऊन हिंदु जनजागृती समितीकडून त्यांना ‘सनातन पंचांग २०२५’ भेट देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक आणि श्री. विनीत पाटील उपस्थित होते.