माधवनगर (सांगली) येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन !
सांगली, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – माधवनगर येथे नवरात्रोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या ‘सनातन-निर्मित्त ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन प्रदर्शना’चे उद्घाटन जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. भगवंतराव जाभले यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी सनातन संस्थेचे श्री. संजय घाडगे यांच्या हस्ते श्री. जाभले यांना ‘हिंदु राष्ट्र्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, सौ. सुलभा तांबडे, सौ. मंजिरी खानझोडे, सौ. पूनम ढमाले आदी उपस्थित होत्या.