दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सायबर चोरांना पोलिसांचा दणका !; आयफोन चोरणार्या मुसलमानाला अटक !
सायबर चोरांना पोलिसांचा दणका !
लुटीचे १ कोटी १ लाख ५८ सहस्र ७२७ रुपये वाचवले !
मुंबई – ऑनलाईन फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन १९३० ही हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे. ५ ऑक्टोबर या दिवशी अनेक मुंबईकरांकडून सायबर चोरांनी वेगवेगळ्या प्रकरणातून अनुमाने १ कोटी १ लाख ५८ सहस्र ७२७ रुपये लुटले. नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने ‘१९३०’ वर संपर्क साधून तक्रार केली. त्यानंतर पैसे वळते झालेल्या बँकांसमवेत संपर्क साधून पोलिसांनी रक्कम गोठवली. यातून लुटलेली सर्व रक्कम पोलिसांनी वाचवली. या वर्षात ‘१९३०’ या हेल्पलाईनच्या माध्यमातून सायबर पोलिसांनी आतापर्यंत ११४ कोटी रुपयांची रक्कम वाचवली आहे. (पोलिसांनी फसवणूक करणार्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा केल्यावरच असे प्रकार अल्प होतील ! – संपादक)
आयफोन चोरणार्या मुसलमानाला अटक !
कल्याण (ठाणे) – फ्लिपकार्ट आस्थापनाच्या गोदामातून चोरी केलेल्या आयफोनचे तांत्रिक अन्वेषण पोलीस करत होते. त्या वेळी चोरी केलेले ४ आयफोन वापरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या जवळील आयफोनची माहिती घेतली. त्यांनी हे भ्रमणभाष उल्हासनगरमधील दुकानातून खरेदी केल्याचे सांगितले. दुकानमालकांना हे भ्रमणभाष फैय्याज शेख या चोराने दिल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी फैय्याज याला अटक केली.
संपादकीय भूमिका : सर्वच क्षेत्रात गुन्हेगारीत पुढे असणारे धर्मांध !
टायर फुटल्याने चारचाकीचा अपघात
३ जणांचा मृत्यू; १ गंभीर घायाळ
जळगाव – जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात ८ ऑक्टोबरला सकाळी भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने चारचाकी चोपडा- नाशिक या शिवशाही बसवर जाऊन आदळली. चारचाकीमधील नीलेश राणे आणि शैलेश राणे या दोघा भावांसमवेत जितेंद्र भोकरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर ओंकार खोंड गंभीर घायाळ झाले.
डाक विभाग विदेशात फराळ पाठवणार !
ठाणे – ठाणे डाक विभागाच्या माध्यमातून जगभरात दिवाळीचा फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे विदेशात गेलेल्या नातेवाइकांना घरगुती आणि भारतीय बनावटीचा फराळ पाठवता येणार आहे. डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय मेल सेवांचे दर इतर खासगी सेवांपेक्षा न्यून आहेत. तरी या सुविधेचा लाभ ठाणे डाक विभागातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.