रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवावे, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही मागणी काँग्रेसकडून यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याविषयी ७ ऑक्टोबर या दिवशी नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले आहे.
शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. उच्च पदावर असलेल्या अधिकारी रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करतात. अशा पक्षपाती अधिकार्यांमुळे विधानसभा निवडणूक पारदर्शकपणे आणि निष्पक्षपातीपणे पार पडण्याविषयी शंका आहे. त्यामुळे शुक्ला यांची तातडीने हकालपट्टी करावी, असे नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.