Zakir Naik : कुख्‍यात झाकीर नाईक याने पाकच्‍या विमान वाहतूक अस्‍थापनावर टीका करत भारताचे केले कौतुक !

सामानावरील शुल्‍क माफ न केल्‍यावरून केली टीका

गुन्‍हेगार झाकीर नाईक

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – पाकिस्‍तानच्‍या दौर्‍यावर असणारा पसार गुन्‍हेगार झाकीर नाईक याने पाकिस्‍तानचे विमान वाहतूक आस्‍थापन ‘पाकिस्‍तान इंटरनॅशनल एअरलाइन्‍स’वर (‘पी.आय.ए.’वर) टीका करत भारताचे कौतुक केले आहे. तो म्‍हणाला की, मी पाकिस्‍तानात सरकारी पाहुणा म्‍हणून आलो असतांनाही ‘पी.आय.ए.’ने माझ्‍या सामानाचे पैसे वसूल केले. भारतात कोणत्‍याही विमान वाहतूक आस्‍थापनाने माझे नाव ऐकल्‍यानंतर माझ्‍या सामानाचे शुल्‍क माफ केले असते. मला खरे बोलतांना वाईट वाटते; पण पाकिस्‍तानची ही अवस्‍था आहे.

संपादकीय भूमिका

स्‍वतःच्‍या स्‍वार्थासाठी पाकवरही टीका करणारा झाकीर कधीतरी भारताचा विश्‍वासू होऊ शकेल का ?