हे परमकल्याणी, तू ब्रह्मलोकवासिनी ।
हे वाग्देवी तू परब्रह्मस्वरूपिणी ।
हे वेदमाता तू वेदस्वरूपिणी ।। १ ।।
हे वागीश्वरी तू आनंददायिनी ।
हे सरस्वतीदेवी तू मोक्षदायिनी ।। २ ।।
हे परमज्ञानी तू ज्ञानवर्धिनी ।
हे वीणापाणि (टीप)
तू संगीतदायिनी ।। ३ ।।
हे वाणी तू हंसवाहिनी ।
हे शारदे तू विद्यादायिनी ।। ४ ।।
हे सरस्वतीदेवी तू भवतारिणी ।
हे ज्ञानदेवी तू ज्ञानभक्ती दायिनी ।। ५ ।।
हे श्वेतवर्णी तू सकल उद्धारिणी ।
हे वाग्देवी तू दैवीगुणसंवर्धिनी ।। ६ ।।
हे सरस्वतीदेवी तू पापनाशिनी ।
हे शारदादेवी तू पुण्यवर्धिनी ।। ७ ।।
हे परमकल्याणी तू ब्रह्मलोकवासिनी ।
हे भारती तू भवरोग निवारिणी ।। ८ ।।
तुला भक्तीभावाने वंदन करते हे ब्रह्माणी ।
आमचा प्रतिपाळ करावा हे विश्वजननी ।। ९ ।।
टीप – हातात वीणा धारण करणारी
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२४)