Pune Omkareshwar Temple Theft : पुणे येथील पेशवेकालीन  ओंकारेश्‍वर मंदिरातील दानपेटी फोडून पैशांची चोरी !

पेशवेकालीन ओंकारेश्‍वर  मंदिर

पुणे – येथील पेशवेकालीन ओंकारेश्‍वर  मंदिरातील दानपेटी फोडून चोरांनी ५ ऑक्‍टोबरला मध्‍यरात्री त्‍यामध्‍ये असलेल्‍या ६ सहस्र रुपये चोरले. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्‍यामध्‍ये गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. ही घटना उघडकीस आल्‍यानंतर कौस्‍तुभ गाडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट (दाखल) केली आहे.

पोलिसांनी मंदिराच्‍या आवारातील सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यांमधील चित्रीकरण अन्‍वेषणासाठी कह्यात घेतले असून, चोरांचा शोध चालू आहे.


याआधीही येरवड्यातील श्री तारकेश्‍वर मंदिर, तसेच शनिवार पेठेतील नवरात्रोत्‍सव मंडळ, नारायण पेठेतील प्रगतीशील मंडळाची दानपेटी फोडून त्‍यातील पैसे चोरले होते. (एवढ्या मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्‍ये चोर्‍या होत असतांना पोलीस काय करत आहेत ? – संपादक) मंदिरांतील चोर्‍यांचे प्रकार रोखण्‍यासाठी पोलिसांनी शहरातील मंदिर प्रशासनाला सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवण्‍याची सूचना केली आहे.

संपादकीय भूमिका

ही स्‍थिती पोलिसांना लज्‍जास्‍पद आहे ! मंदिरातील चोर्‍या थांबवण्‍यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, हीच भाविकांची अपेक्षा !