Sabarimala Prasad Row : शबरीमला मंदिराचा ‘अरवण प्रसाद’ दीर्घकाळ साठवणूक झाल्याने त्याचे खतामध्ये रूपांतर करणार !

  • त्रावणकोर देवस्वम् मंडळाचा निर्णय

  • साडेपाच कोटी रुपयांच्या या प्रसादाची ६ लाख ६५ सहस्र लहान डब्यांमध्ये साठवणूक

शबरीमला मंदिर

थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना ‘अरवण प्रसाद’ दिला जतो. अय्यप्पा स्वामींच्या प्रतिमेसह एका लहान डब्यात हा प्रसाद भक्तांना देण्यात येतो. गेल्या एक वर्षापासून साठवून ठेवलेल्या अरवण प्रसादामध्ये अधिक प्रमाणात अळ्या आढळल्याचा दावा जानेवारी २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून करण्यात आला होता; मात्र याचिकाकर्त्यांनी या संदर्भात कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.

यानंतर आता या मंदिराचे नियंत्रण असणार्‍या त्रावणकोर देवस्वम् मंडळाने सुमारे ६ लाख ६५ लाख डब्यांमध्ये (‘टिन कंटेनर’मध्ये) साठवलेला ‘अरवण प्रसाद’ दीर्घकाळ साठवणूक झाल्यामुळे भक्तांना न देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी हा प्रसाद जंगलात फेकून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता; मात्र तो जंगलात फेकण्याऐवजी वैज्ञानिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून त्याचे खतामध्ये रूपांतर करणे योग्य ठरेल, असा अंतिम निर्णय घेण्यात आला. या प्रसादाचे मूल्य साडेपाच कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका

एखादा प्रसाद दीर्घकाळ साठवून का ठेवला जातो ?