Bangladesh Durga Puja : बांगलादेशात कट्टरतावाद्यांच्या भयामुळे यंदा दुर्गापूजा मंडपांची संख्या १ सहस्राने अल्प !
किमान १० ठिकाणी देवीच्या मूर्तींची विटंबना, कारवाईत मात्र अनास्था !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात ३ ऑक्टोबरला ‘शुभो महालया’नंतर (सर्वपित्री अमावास्येनंतर) बंगाली हिंदूंचा सर्वांत मोठा धार्मिक सण दुर्गापूजेला आरंभ झाला. अशातच महालयाच्या रात्रीच किमान १० ठिकाणी दुर्गादेवीच्या अनेक मूर्ती तोडल्या गेल्या. या विरुद्ध पोलिसी कारवाईतही अनास्था दिसून आली. एकूणच भयाच्या सावटाखाली हिंदू दुर्गापूजा उत्सव साजरा करत आहेत. ‘बांगलादेश पूजा समारोह समिती’नुसार गेल्या वर्षी ३२ सहस्र ४०८ मंडपांमध्ये दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा मात्र हा आकडा किमान १ सहस्राहून अल्प असल्याचे सांगितले जात आहे.
Due to the fear of extremists in Bangladesh, the number of Durga Puja 🕉️🔱🪔 pandals has decreased by 1,000 this year!
🚨 At least 10 instances of desecration of the Goddess’ idols have occurred, yet the authorities remain indifferent in taking action.
This situation is… pic.twitter.com/o10DuxRGf4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 8, 2024
१. यासंदर्भात ‘बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ओइक्या परिषदे’चे कार्यवाहक महासचिव मनिंद्रकुमार नाथ म्हणाले की, चट्टोग्राम, खुलना आणि ढाका जिल्ह्यांत अनेक ठिकाणी दुर्गापूजा मंडपांचे आयोजन करण्यात आलेले नाही. १०-१२ ठिकाणी मूर्तींची विटंबना करण्यात आली. त्यानंतर आरोपींना शासन करण्यात सरकारने अनास्था दाखवली.
२. गेल्या २ महिन्यांत हिंदूंवर आक्रमणांचे सत्र सातत्याने चालू असल्याने हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण व्याप्त आहे. फरीदपूर, बरगुना, गौनीपूर, किशोरगंज, नारेल, पवना यांसह अन्य ठिकाणांवर मूर्तींची तोडफोड झाली. गेल्या २ महिन्यांत किमान २ सहस्र १० ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे झाली आहेत.
३. चट्टोग्राम विद्यापिठातील संस्कृतचे साहाय्यक प्राध्यापक कुशल बरन चक्रवर्ती म्हणाले की, वैयक्तिकदृष्ट्या मला ठाऊक आहे की, आमच्या शहरात यंदा कमीत कमी १०० ठिकाणी दुर्गापूजेचे आयोजन करण्यात येणार नाही.
४. सुरक्षा कारणास्तव सर्वत्र भयाचे वातावरण असले, तरी राजधानी ढाक्यात दुर्गामातेच्या स्वागताप्रीत्यर्थ रमना स्थित काली मंदिरापासून ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर, राजरबाग कालीमंदिर, रामकृष्ण मिशन आणि सिद्धेश्वरी कालीमंदिर येथे मूर्ती निर्मितीसह सजावटीचे काम चालू आहे.
५. रमना कालीमंदिराचे पुजारी हरिचंद चक्रवर्ती यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबरला महाषष्ठी, १० ऑक्टोबरला महासप्तमी, ११ ऑक्टोबरला महाष्टमी आणि १२ ऑक्टोबरला महानवमी पूजा होईल.
संपादकीय भूमिका
|