Vadodara Girl Gang Rape Case : वडोदरा (गुजरात) येथे सामूहिक बलात्कार करणारे मुन्ना, आफताब आणि शाहरूख यांना अटक !
अल्पवयीन मुलगी मित्राशी बोलत असतांना त्यांच्यावर आक्रमण करून केला बलात्कार !
वडोदरा (गुजरात) – शहरातील भैली भागात काही दिवसांपूर्वी एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी मुख्य ३ आरोपींसह ५ जणांना अटक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या साहाय्याने पोलीस बलात्कार्यांपर्यंत पोचू शकले. तिघेही बलात्कारी मूळचे उत्तरप्रदेश राज्याचे रहिवासी असून मुन्ना अब्बास बंजारा (वय २७ वर्षे), मुमताझ उपाख्य आफताब सुभेदार बंजारा (वय ३६ वर्षे) आणि शाहरूख किस्मत अली बंजारा (वय २६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
१. वडोदराचे पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर आरोपींनी पीडितेचा भ्रमणभाष समवेत नेला होता.
२. पीडितेच्या कुटुंबियांनी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एका बलात्कार्याने तो घेतला. त्यावर तो काही बोलला नाही; परंतु ७ सेकंद तो चालू राहिला. त्यानंतर पोलिसांनी भ्रमणभाषचे ‘लोकेशन ट्रेस’ (स्थळ निश्चिती) केले.
३. यामुळे पोलीस तेथे जाऊन त्यांनी स्थानिक सीसीटीव्हीमधील चित्रीकरण पडताळले. त्यातून आरोपींपर्यंत पोचता आले.
४. पोलीस अधीक्षक म्हणाले की, इयत्ता ११ वीत शिकणारी १६ वर्षीय मुलगी रात्री ११.३० वाजता भैली भागातील एका निर्जन रस्त्याच्या कडेला तिच्या मित्रासमवेत बोलत बसली होती. त्या वेळी दोन दुचाकींवरून ५ तरुण तिच्याजवळ आले. त्यांपैकी दोघे तिकडून निघून गेले; परंतु अन्य तिघांनी तिच्यावर अत्याचार करून तिचा भ्रमणभाष पळवला. पीडितेच्या मित्राला एकाने पकडून अन्यांनी तिच्यावर बलात्कार केला.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! शरीयत कायद्याचे समर्थन करणारे आणि त्यांच्या मतांसाठी लाळघोटेपणा करणारे कधी अशा वासनांध मुसलमानांना शरीयतनुसार भूमीत खोल खड्डा करून त्यात या बलात्कार्यांना कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून मारण्याच्या शिक्षेची मागणी का करत नाहीत ? |