Stone Pelting UP : उत्तरप्रदेशातील मेरठ, अलीगड, आग्रा, एटा आणि कन्नौज येथे मुसलमानांकडून हिंसक निदर्शने : पोलिसांवर दगडफेक !
गाझियाबादचे महंत यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याचे प्रकरण !
मेरठ (उत्तरप्रदेश) – गाझियाबादच्या श्री डासनादेवी मंदिराचे महंत आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून राज्यात मुसलमानांकडून निदर्शने करत हिंसाचार केला जात आहे. ७ ऑक्टोबर या दिवशी मेरठसह अलीगढ, आग्रा, एटा आणि कन्नौज इत्यादी ठिकाणी मुसलमानांनी रस्त्यावर उतरून केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. मेरठमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. अलीगडमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. गाझियाबादमध्ये यति नरसिंहानंद यांच्या समर्थकांनीही निदर्शने केली.
१. राज्यातील पोलिसांनी ठिकठिकाणी पोलिसांनी ३० नामांकित व्यक्ती आणि १५० अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
२. बर्याच ठिकाणी मोर्च्यांमध्ये सहभागी मुसलमान तरुण तलवारी आणि काठ्या घेऊन हिंदुविरोधी आणि देशविरोधी घोषणा देत होते.
३. अलीगड येथे ‘अलीगड मुस्लिम विद्यापिठा’चे सहस्रावधी विद्यार्थी निषेधमोर्चात सहभागी झाले होते.
४. आग्रा येथेही ‘उत्तरप्रदेश मुस्लिम महापंचायती’ने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रकरणी आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. यांपैकी १३ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गाझियाबादमध्ये यति नरसिंहानंद समर्थकांचा मोर्चा !
महामंडलेश्वर यति नरसिंहानंद यांच्या समर्थकांनी गाझियाबाद पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यांनी पोलीस अधिकार्यांकडे यति नरसिंहानंद यांच्याविषयी विचारपूस केली. पोलिसांनी यति नरसिंहानंद यांना ५ ऑक्टोबर या दिवशी कह्यात घेतले होते. यति नरसिंहानंद सरस्वती फाऊंडेशनच्या सरचिटणीस डॉ. उदिता त्यागी यांनी सांगितले की, महामंडलेश्वर सध्या कुठे आहेत, याची आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही. ते सापडले नाहीत, तर हिंदु संघटना १३ ऑक्टोबरला महापंचायत घेणार आहेत.
यति नरसिंहानंद कोण आहेत ?
महामंडलेश्वर यति नरसिंहानंद यांचे मूळ नाव दीपक त्यागी असे आहे. यति नरसिंहानंद हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी मेरठ आणि हापूड येथे प्राथमिक शिक्षण घेतले. वर्ष १९९२ मध्ये त्यांनी गणित विषयात घेण्यात येणार्या ऑलंपियाड स्पर्धेत विक्रम केला. त्यांनतर त्यांनी रशियाची राजधानी मास्को येथून एम्.टेक केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रात काम केले. त्यानंतर त्यांनी लंडनमध्येही नोकरीही केली. वर्ष १९९६ मध्ये त्यांनी विवाह केला. भारतात परतल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी समाजवादी पक्षाच्या बाजूने निवडणूक जिंकून गाझियाबाद महानगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले. वर्ष २००१ त्यांनी पत्नी आणि २ वर्षांची मुलगी यांचा त्याग करून संन्यास घेतला. वर्ष २००२ मध्ये त्यांनी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्यांचे यति नरसिंहानंद असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर ते बराच काळ दूधेश्वरनाथ मंदिरात राहिले. काही वर्षांनंतर संतांनी त्यांना श्री डासनादेवी मंदिराचे महंत बनवले. आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्या विरोधात ८० तक्रारी नोंद आहेत.
संपादकीय भूमिकापोलिसांवर दगडफेक करण्याइतपत उद्दाम झालेल्या धर्मांध मुसलमानांना वठणीवर आणण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ? |