FIR On Mohammad Zubair : ‘अल्‍ट न्‍यूज’चा सहसंस्‍थापक महंमद जुबेर याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद

गाझियाबादच्‍या श्री डासनादेवी मंदिरावर आक्रमण करण्‍यासाठी सहस्रो मुसलमानांना चिथावल्‍याचा आरोप

‘अल्‍ट न्‍यूज’चा सहसंस्‍थापक महंमद जुबेर व महंत यति नरसिंहानंद

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील श्री डासनादेवी मंदिराबाहेर ४ ऑक्‍टोबरच्‍या रात्री सहस्रोंच्‍या संख्‍येने मुसलमान जमा झाले होते. मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांच्‍याविषयी केलेल्‍या कथित आक्षेपार्ह विधानावरून मुसलमान निषेधासाठी मंदिराबाहेर जमले होते. त्‍यांनी मंदिरात घुसण्‍याचाही प्रयत्न केला. या वेळी ‘सर तन से जुदा’ (शिरच्‍छेद करणे) अशा घोषणा देण्‍यात येत होत्‍या. या वेळी पोलिसांनी त्‍यांच्‍यावर लाठीमार करून त्‍यांना पांगवले. मुसलमानांना मोठ्या संख्‍येने येथे गोळा करण्‍यामागे ‘अल्‍ट न्‍यूज’चा सहसंस्‍थापक महंमद जुबेर असल्‍याची प्राथमिक माहिती मिळाल्‍यानंतर पोलिसांनी त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवला आहे. ‘जुबेर याच्‍यासह अन्‍य मुसलमानांवर राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्याच्‍या अंतर्गत कारवाई करावी’, अशी मागणी हिंदु संघटनांनी केली आहे. तसे न केल्‍यास १३ ऑक्‍टोबरला महापंचायत आयोजित करण्‍याची घोषणा केली आहे.

१. स्‍वत: या घटनेच्‍या प्रत्‍यक्षदर्शी आणि पीडित असलेल्‍या भाजपच्‍या नेत्‍या डॉ. उदिता त्‍यागी यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्‍ट (दाखल) केली आहे.

२. यात त्‍यांनी गाझियाबाद पोलीस आयुक्‍तांना सांगितले, ‘डासना मंदिरावरील आक्रमण सुनियोजित कट होता. या आक्रमणासाठी मुसलमानांना महंमद जुबेर, असदुद्दीन ओवैसी आणि अर्शद मदनी यांनी भडकावले. या आक्रमणात  बाहेरून आलेल्‍या मुसलमानांचा सहभाग असल्‍याचे समोर आले आहे.

३. या हिंसाचाराच्‍या मागे यति नरसिंहानंद गिरि यांच्‍या हत्‍येचा कट होता, असाही गंभीर आरोप डॉ. उदिता त्‍यागी यांनी केला आहे. या तक्रारीवर मंदिरात उपस्‍थित हिंदु समाजातील १२ हून अधिक लोकांच्‍या स्‍वाक्षर्‍या आहेत. आक्रमणाच्‍या वेळी डासना मंदिरात हे लोक उपस्‍थित होते

४. डॉ. उदिता त्‍यागी यांनी पोलीस आयुक्‍तांना आणखी एक तक्रार दिली आहे. यात म्‍हटले आहे की, जुबेर याने कट्टरवाद्यांचे लक्ष्य असलेल्‍या १० हिंदुत्‍वनिष्‍ठांची सूची बनवली आहे. यात त्‍यांच्‍या नावाचाही समावेश आहे. ‘जुबेर याला कारागृहात न पाठवल्‍यास त्‍याच्‍यामुळे अनेक हिंदूंच्‍या जिवाला धोका निर्माण होईल’, असे या तक्रारीत म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

महंमद जुबेर याला पूर्वीही हिंदूंच्‍या विरोधात कृती केल्‍यावरून अटक करण्‍यात आली होती. यातून त्‍याची जिहादी मानसिकता लक्षात येते ! अशांना आजन्‍म कारागृहात टाकण्‍यासाठी पोलीस आणि सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !