Bangladeshi Infiltrators In Dadar : दादर येथे १० बांगलादेशी घुसखोरांची बसमध्ये वादावादी !

प्रवाशांच्या आक्रमक पवित्र्यानंतर घुसखोर पसार !

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – दादर (पश्‍चिम) येथून किडवई येथे जाणार्‍या ४६ क्रमांकाच्या बेस्ट गाडीमध्ये १० बांगलादेशी आढळले. त्यांनी गाडीत केलेल्या वादावादीमुळे बसमधील अन्य प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यास चालकाला सांगितले; मात्र चालकाने गाडी थांबवल्यावर सर्व बांगलादेशी पसार झाले.

७ ऑक्टोबरच्या सायंकाळी ७ वाजता दादरच्या लोकमान्य टिळक पुलावर ही घटना घडली. हे सर्व बांगलादेशी येथील प्लाझा चित्रपटगृहाच्या जवळ कडवई येथे जाण्यासाठी बसमध्ये चढले. गाडीत पुष्कळ गर्दी होती. या वेळी त्यांनी गाडीत वाद घातला. त्यामुळे गाडीतील अन्य प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत गाडी पोलीस ठाण्यात नेण्याची मागणी केली. वाहकाने मात्र लोकमान्य टिळक पुलावर गाडी थांबवण्यास सांगितल्यामुळे हे सर्व बांगलादेशी तेथून पसार झाले. या वेळी एका प्रवाशाने ‘सनातन प्रभात’ला सांगितले की, ‘हे सर्व बांगलादेशी सायंकाळी येथे गाडीत चढतात आणि किडवई येथे उतरतात. गाडीमध्ये त्यांचा उद्दामपणा चालू असतो. त्यांच्या बोलण्यातून ते बांगलादेशातील चट्टोग्राम येथील असल्याचे कळले.’

दादरमध्ये बांगलादेशींचा सुळसुळाट !

काही दिवसांपूर्वी दादर (पश्‍चिम) येथील शिवाजी पार्क येथे भाजपच्या नेत्या सौ. अक्षता तेंडुलकर यांनी तेथीलच स्थानिक व्यवसायावर बांगलादेशी घुसखोरांनी नियंत्रण मिळवल्याचे सांगून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दादर पूर्व आणि पश्‍चिम येथे रस्त्यांवरील फळविक्रेते, दूधविक्रेते, फूलविक्रेते, तसेच पादचारी मार्गावरील विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशींची संख्या दिसून येते. याविषयी स्थानिक नागरिकांकडे विचारणा केली असता स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने ते व्यवसाय करत असल्याचे समजते. (बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या महाराष्ट्रासाठी चिंताजनकच ! – संपादक)

संपादकीय भूमिका

उद्दामपणा करणार्‍या बांगलादेशी घुसखोरांवर आणि त्यांच्या वाढत्या संख्येवर राज्य सरकार नियंत्रण कधी मिळवणार ?