अभिजात भाषेचा दर्जाच्या कार्यवाहीविषयी मराठी भाषा विभाग मार्गदर्शन घेणार !
मुंबई, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला, तरी या अनुषंगाने पुढील कार्यवाही कोणती करावी ? याविषयी केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडून अद्याप महाराष्ट्र शासनाला मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे मराठी भाषा विभागाने याविषयी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयात आणि अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या भाषांची राज्ये यांच्याकडून मार्गदर्शक सूचना मागवणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाच्या अधिकार्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली.
केंद्रशासनाकडून मराठी भाषेविषयी राज्यात केंद्र उभारण्यात येणार आहे का ? याविषयी मराठी भाषा विभागाकडून माहिती घेण्यात येणार आहे. मराठी भाषाभवनाच्या बांधकामाच्या शुभारंभानंतर मराठी भाषा विभागाकडून अभिजात भाषेच्या दर्जाविषयी मराठी भाषा विभाग केंद्रशासनाशी समन्वय करणार असल्याची मराठी भाषा विभागाच्या अधिकार्यांनी माहिती दिली.