भाईंदर येथे नवीन पशूवधगृह उभारण्याचा निर्णय रहित !
निर्णय मागे न घेतल्यास महापालिकेच्या मुख्यालयावरून उडी मारण्याची माजी आमदारांनी दिली होती चेतावणी !
भाईंदर – येथील उत्तन परिसरात उभारण्यात येणार्या नवीन पशूवधगृहास भाजपने विरोध केला आहे. हा निर्णय ८ ऑक्टोबरपर्यंत मागे न घेतल्यास महापालिकेच्या मुख्यालयावरून उडी मारीन, अशी चेतावणी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. ७ ऑक्टोबर या दिवशी मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त श्री. संजय काटकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पशूवधगृह उभारण्याचा निर्णय रहित करण्यात आला.
बैठकीत अनेक संस्थांचे हिंदु पदाधिकारीही उपस्थित होते. पशूवधगृह रहित करण्यासाठी अनेकांनी आवाज उठवला होता.