पिंपरी-चिंचवड शहरात हवा प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम !
श्वसनसंस्थेच्या आजारांत ६ पटींनी वाढ !
पिंपरी-चिंचवड – शहरातील हवा प्रदूषणात सातत्याने वाढ होत असून त्याचे दुष्परिणाम शहरवासियांच्या आरोग्यावर होऊ लागले आहेत. प्रदूषणवाढीमुळे शहरातील रुग्णांना श्वासोच्छवास, फुफ्फुसांचे विकार होत असून ३ वर्षांत ही संख्या वाढल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय आकडेवारीत समोर आले आहे. वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. त्याचा परिणाम म्हणून शहराच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या विहित मर्यादेपेक्षा अधिक आहे. महापालिका क्षेत्रात होणारी बांधकामे आणि सणांच्या काळात धूलीकणांमध्ये वाढ होत असल्याचे याविषयीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.