कीर्तीवान होण्यासाठी सद्गुण हाच माणसाचा स्वभाव बनावा लागतो !
माणसाने अशी थोरवी संपादन केली पाहिजे की, त्याने स्वतः प्रयत्न न करताही लोकांनी पिढ्यानपिढ्या त्याचे गुण गात राहिले पाहिजे. कीर्ती सत्तेने वा संपत्तीने विकत घेता येत नाही. ती शील, चारित्र्य, कर्तृत्व, त्याग, औदार्य, पराक्रम, जनहिताची तळमळ इत्यादी सद्गुणांच्या बळावर प्राप्त होत असते. हे सद्गुण केव्हा तरी निमित्ता-निमित्ताने प्रगट होऊन चालत नाहीत, तर ते सद्गुण हाच माणसाचा स्वभाव बनावा लागतो. याकरता त्याग, श्रम आणि सातत्य अपेक्षित असते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)