रामनाथी आश्रमात दशमहाविद्या याग होत असतांना साधकाला आश्रम आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
‘वर्ष २०२३ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दशमहाविद्या याग झाले. त्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी आश्रमात यज्ञयाग चालू असतांना ‘हा याग कैलास पर्वताच्या पायथ्याशी होत आहे’, असे मला जाणवले आणि दैवी चित्र डोळ्यांसमोर येऊन मला भावस्थिती अनुभवता आली.
२. रामनाथी आश्रम हिमालयाप्रमाणे जाणवणे
अ. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाची रचनाही हिमालयाप्रमाणेच आहे’, असे मला जाणवते आणि तसे अनुभवता येते.
आ. हिमालयात शिवाचा वास कैलास पर्वतावर आहे, त्याप्रमाणेच या आश्रमात प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) निवास आहे.
इ. कैलास पर्वताच्या पायथ्याशी गंगा नदीचा उगम आहे आणि रामनाथी आश्रमातील ते स्थान, म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची सेवा करतात ती खोली आहे.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साक्षात् गंगा नदीच आहेत. भक्तगण गंगा नदीत स्नान करून धन्य होतात, त्याप्रमाणे सर्वत्रचे साधक या गंगामातेकडून साधना करण्यासाठी प्रेरणा घेऊन जातात. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची भेट झाल्यावर प्रत्येक साधक तळमळीने प्रयत्न करतो आणि सकारात्मक होतो.
आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची भेट झाल्यावर जीव आनंदी होतो.
इ. संतांचे जन्मस्थान आणि अनेक पवित्र नद्यांचे उगमस्थान यांच्याकडे जात असतांना आपल्याला चैतन्य अनुभवता येते, तसेच चैतन्य श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीकडे जातांना अन् तेथील परिसरात अनुभवता येते.
ई. माझ्या मनाचा संघर्ष होत असतांना ‘मी त्यांच्या खोलीकडे १० मिनिटे पाहिल्यावर माझे मन हलके होते आणि मला पुढील प्रयत्न करण्यास बळ मिळते’, असे मला अनुभवता आले आहे.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे ईश्वरा, परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रती माझी श्रद्धा वृद्धींगत होऊ दे’, अशी तुझ्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे. हे श्रीकृष्णा, मला या अनुभूती दिल्याबद्दल मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. विठ्ठल रामचंद्र कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०२३)
|