मिरज येथील मोहन वनखंडे यांची भाजपला सोडचिठ्ठी !
मिरज, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – भाजपचे अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कोल्हापूर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. मोहन वनखंडे हे अनेक वर्षे भाजपचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे स्वीय साहाय्यक म्हणून कार्यरत होते; मात्र त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने ते गेल्या २ वर्षांपासून खाडे यांच्यापासून दूर गेले होते.