अटल सेतू जड वाहनांसाठी लोकप्रिय मार्ग !
|
मुंबई – अटल सेतू हा मार्ग जड वाहनांसाठी लोकप्रिय मार्ग ठरला आहे, अशी माहिती ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’कडून माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना मिळालेली आहे.
१. जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत ट्रक आणि बस अशा जड वाहनांच्या वाहतुकीत ७०० टक्क्यांनी वाढ झाली आहे; मात्र ही वाहतूक एकूण वाहतुकीच्या फक्त ७ टक्क्यांच्या आसपास आहे, तर सुमारे ९३ टक्के वाहतूक प्रवासी गाड्यांची आहे.
२. पुलावरील चारचाकींच्या संख्येत ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
३. नवी मुंबईहून दक्षिण मुंबईत प्रतिदिन जाणार्या प्रवाशांना ३७५ रुपये पथकर परवडत नाही. त्यामुळे मध्यमवर्गीय प्रवासी जुन्या मार्गांचा वापर करतात.
घाडगे यांच्या मते, पुलाचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने खासगी चारचाकींसाठी पथकराच्या शुल्कात ४० टक्क्यांची कपात करावी आणि टॅक्सी अन् खासगी कॅब सेवांसाठी पथकर माफ करावा. त्यामुळे सर्वसामान्यांना पुलाचा लाभ मिळेल, अन्यथा हा पूल केवळ श्रीमंत आणि व्यावसायिक जड वाहनांसाठीच उपयुक्त ठरेल.