जन्मोत्सवाच्या दिव्य सोहळ्याचा सूक्ष्मातून लाभ करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !
‘४.६.२०२४ या दिवशी मी कार्यालयातील काम पूर्ण करून सत्संगाला निघालो होतो. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘आता मी प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याला जात आहे.’ कार्यालयीन कामाच्या दिवशी सत्संग असल्यास सत्संगाला जातांना मला पुष्कळ अडथळ्यांना सामोरे जावे लागत असे; पण त्या दिवशी अडचण न येता मी सत्संगाला वेळेत पोचलो. त्या दिवशी सत्संगात इतर दिवसांच्या तुलनेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते आणि सत्संग चैतन्याच्या स्तरावर झाला. त्यानंतर माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, ‘आज असे कसे झाले ?’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘मी सत्संगाला जात असतांना माझ्या मनात जन्मोत्सवाला जाण्याविषयी आलेला विचार, हा विचार नसून गुरुदेवांप्रतीचा भावच होता. या भावामुळेच सर्व सकारात्मक घडत गेले.’
त्यानंतर काही वेळाने माझ्या लक्षात आले, ‘सत्संगाच्या दिवशी प.पू. गुरुदेवांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका यागाचे आयोजन करण्यात आले होते.’ त्या वेळी मला सर्व विषयाचा उलगडा झाला. ‘सत्संगाला जातांना माझ्या मनात ‘मी प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाला, म्हणजेच जन्मोत्सवाच्या निमित्ताने होणार्या यागात सहभागी होण्यासाठीच जात आहे’, असा विचार होता’, असे माझ्या लक्षात आले. माझ्या मनातील या भावामुळे मी जन्मोत्सवाचा सूक्ष्मातून साक्षीदारच बनलो होतो. या जन्मोत्सवाच्या दिव्य सोहळ्याचा कुठेही न जाता, अगदी आहे त्या ठिकाणी लाभ करून देणार्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. राजाराम कृष्णा परब, तेर्सेबांबर्डे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (४.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |