मिरज येथे नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन !
मिरज (जिल्हा सांगली), ७ ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रोत्सवानिमित्त ३ ऑक्टोबरपासून ब्राह्मणपुरीमधील श्री अंबाबाई मंदिरासमोर सनातन संस्थेच्या वतीने ‘आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने’ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन येथील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक श्री. किशोर पटवर्धन यांच्या पत्नी सौ. इरावती पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी त्यांच्या स्नुषा सौ. पूजा प्रणव पटवर्धन, सनातनच्या साधिका अन् आधुनिक वैद्या श्रीमती मृणालिनी भोसले, कु. माधवी आचार्य, कु. सुरेखा आचार्य उपस्थित होत्या. या वेळी सनातनचे साधक श्री. द्वारकाधीश मुंदडा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले, तसेच सौ. इरावती पटवर्धन यांना ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.