पेण येथे शांतता समितीचे सदस्य आणि ठाकरे गटाचा नेता शादाब भाई याच्या विरोधात गुन्हा नोंद !
पक्षातील महिलेचा विनयभंग केला
पेण – शहरातील पोलीस स्टेशन शांतता समितीचे सदस्य आणि ठाकरे गटाचा युवा नेता शादाब भाई याने त्याच्याच पक्षातील महिलेचा विनयभंग केला. त्याने पीडित कार्यकर्तीला पेण येथे एका ठिकाणी भेटण्यास बोलावले. ‘पक्षाच्या कार्यक्रमाविषयी तुझ्याशी बोलायचे आहे’, असे सांगून तिची छेड काढली. पीडित कार्यकर्ती शादाबच्या घरी झालेल्या प्रकाराविषयी सांगण्यासाठी गेली; मात्र त्याच्या घरच्यांनीही तिची अपकीर्ती करत तिला शिवीगाळ केली. या प्रकरणी तिने पोलीस ठाण्यात शादाब भाई, त्याची पत्नी आणि त्याची आई यांच्या विरुद्ध तक्रार प्रविष्ट केली. (गुन्हेगारी वृत्तीचे मुसलमान आणि त्यांची पाठराखण करणारे त्यांचे कुटुंबीयही गुन्हेगारच ! अशांना कारागृहातच डांबायला हवे ! – संपादक) त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकाशांतता समितीत असे सदस्य असणे लज्जास्पद ! समितीने अशा सदस्यांना काढून टाकायला हवे ! |