Hizbullah attack on Israel : इस्रायलच्या हैफा शहरावर हिजबुल्लाचे आक्रमण !
तेल अविव – हिजबुल्लाने(Hizbullah) ६ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलच्या(Israel) हैफा शहरावर(Haifa city) आक्रमण केले. या आक्रमणात किमान १० जण घायाळ झाले आहेत. हिजबुल्लाने तिबेरियास शहरावरही आक्रमण केले. त्याच वेळी हिजबुल्लाने इस्रायलच्या ‘कार्मेल मिलिटरी बेस’लाही लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. इस्रायली अधिकार्यांनी सांगितले की, हिजबुल्लाने ६ ऑक्टोबरच्या रात्री लेबनॉनमधून १२० हून अधिक रॉकेट डागले.
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या विरोधात इस्रायली सैन्याची लढाई चालूच आहे. लेबनॉन सीमेवर झालेल्या आक्रमणात १ इस्रायली सैनिक ठार झाला आहे, तर २ सैनिक घायाळ झाले आहेत.