Bihar Bangladeshi Intruder Arrested : बांगलादेशी घुसखोर नवाब याला बिहारमध्‍ये अटक !

अटक करण्यात आलेला बांगलादेशी घुसखोर नवाब

पाटलीपुत्रा (बिहार) – भारतीय पारपत्र (पासपोर्ट) मिळवण्‍याच्‍या प्रयत्नात असतांना बांगलादेशी घुसखोर नवाब याला बिहार पोलिसांनी अटक केली. आरोपी बिहारच्‍या अररिया जिल्‍ह्यातील रामपूर कुदारकट्टी गावात गेल्‍या ३ वर्षांपासून अवैधरित्‍या रहात होता. (हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्‍जास्‍पद ! – संपादक)

१. घुसखोर नवाब अररिया येथे स्‍थलांतरित होण्‍यापूर्वी बिहारमधील कटिहार येथे रहात होता. त्‍याने रंगीला खातून नावाच्‍या महिलेशी दीड वर्षांपूर्वी विवाह केला होता. नवाबला नुसरत खातून नावाची एक मुलगीही आहे.

२. भारतीय पारपत्रासाठी अर्ज करण्‍याचा प्रयत्न करतांना तो बांगलादेशी घुसखोर असल्‍याचे उघड झाले. त्‍याने ‘बूथ लेव्‍हल ऑफिसर’ (बीएलओ) ला पैसे देऊन भारतीय मतदार ओळखपत्र मिळवले होते.

३. रामपूर कुदारकट्टी पंचायत समितीच्‍या अध्‍यक्षा पम्‍मीदेवी यांना नवाबच्‍या कागदपत्रांची पडताळणी करतांना संशय आला. या प्रकरणी त्‍याच्‍याकडे विचारपूस केल्‍यावर नवाबने तो बांगलादेशी नागरिक असल्‍याचे मान्‍य केले.

४. त्‍याविषयी पोलिसांना माहिती देण्‍यात आली. पोलिसांनी नवाबला अटक करून त्‍याची कोठडीत रवानगी केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.

५. नुकतेच महाराष्‍ट्र पोलिसांनी बन्‍ना शेख या अश्‍लील चित्रपटांमध्‍ये काम करणार्‍या बांगलादेशी अभिनेत्रीला भारतात अवैधरित्‍या वास्‍तव्‍य केल्‍याविषयी अटक केली होती. ती बांगलादेशी मुसलमान असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले असून ती बनावट कागदपत्रे वापरून भारतात रहात होती. (अशा घुसखोरांना हुडकून काढून त्‍यांना हुसकावून लावणारे राज्‍यकर्ते हवेत ! – संपादक)

संपादकीय भूमिका

बांगलादेशी घुसखोर’ ही राष्‍ट्रीय समस्‍या घोषित करून त्‍याच्‍या निवारणासाठी आता सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्‍यक !