दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १११ पोलिसांचे तातडीने स्थानांतर !; वसतीगृहातील जेवणातून विषबाधा !
१११ पोलिसांचे तातडीने स्थानांतर !
मुंबई – राज्यशासनाने महाराष्ट्रातील १११ पोलिसांचे तातडीने स्थानांतर केले आहे. ‘३ वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या अधिकार्यांचे तातडीने स्थानांतर करा’, अशी सुचना निवडणूक आयोगाने बैठकीत सूचना दिली आहे. त्यानुसार राज्यशासनाने वरील निर्णय घेतला. आयोगाच्या सूचनेनुसार मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांचे मुंबईबाहेर, तर यांपैकी सर्वाधिक अधिकार्यांचे ठाणे जिल्ह्यात स्थानांतर करण्यात आले आहे.
वसतीगृहातील जेवणातून विषबाधा !
जेवणात सरडा असल्याचे छायाचित्र प्रसारित
लातूर – येथील शासकीय वसतीगृहात रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने अनेक विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. उलटी आणि मळमळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. वसतीगृहातील जेवणात सरडा असल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. (विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळणार्या संबंधितांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)