संयुक्त संसदीय समितीसमोर महाराष्ट्रातील वक्फ बोर्ड संबंधित अवैध भूमींची सूची सादर होणार !
अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी संपर्क साधण्याचे आवाहन !
पुणे – येथील गंज पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, नाना पेठ, कॅम्प या भागांतील एकूण ४ सहस्र एकर भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर आहे, तसेच महाराष्ट्रातील काही लहान-मोठ्या शहरांतही वक्फ बोर्डाने लोकांच्या भूमी घेतल्या आहेत. अशा सर्व लोकांनी, तसेच आपले सगेसोयरे कुणी यात अडकले असल्यास भूमीच्या संदर्भातील कागदपत्रे घेऊन आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी संपर्क साधावा.
वक्फ बोर्डासाठी ‘जेपीसी’ म्हणजेच महाराष्ट्रासाठी संयुक्त संसदीय समिती मेंबर म्हणून नियुक्त केलेल्या खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्याकडे ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ आपली तक्रार मांडेल. तरी कृपया यासंदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.