काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जात्यंधपणा !
(म्हणे) ‘शिवरायांच्या राज्याभिषेकाला पेशवाई वृत्तीने विरोध केला !’
मुंबई – भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच मान्य नाहीत. शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाला पेशवाई वृत्तीने विरोध केला होता आणि आजही त्याच पेशवाई विचाराचे राज्य महाराष्ट्रातही आहे. शिवाजी महाराजांचे विचार हीच प्रवृत्ती संपवत आहे, अशी जात्यंध गरळओळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ६ ऑक्टोबर या दिवशी टिळक भवन येथे ‘शक्ती अभियाना’च्या शुभारंभानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना पटोले यांनी हा जात्यंधपणा दाखवला.
या वेळी नाना पटोले म्हणाले, ‘‘कारागृहात शिक्षा भोगत असतांना ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे लिखाण केले, त्याविषयी नंतर माहिती घेऊन त्यांनी दुरुस्ती केली आणि क्षमाही मागितली. भाजपकडून मात्र सातत्याने खोटे बोलून याविषयी अपप्रचार केला जात आहे.’’