विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म हाच जगाचा खरा आधारवट ! – पू. भिडेगुरुजी
सांगली, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म हाच या जगाचा खरा आधारवट आहे. श्री दुर्गामाता आणि भारतमाता यांच्याप्रती हिंदूंनी श्रीराम भक्त हनुमंतांप्रमाणे अंतरात उत्कट भावभक्ती जागवल्यास तिचा जागर मनात निश्चितपणे अनुभव करता येईल. या उत्कट भक्तीची शक्ती उरात जागवून भारतमातेच्या रक्षणास पात्र होऊया, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले. ५ ऑक्टोबर या दिवशी श्री दुर्गामाता दौडीचे तिसरे पुष्प गुंफतांना ते मार्गदर्शन करत होते.