३ अल्पवयीन मुलांकडून ५ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार !
पुणे – येथील कोंढवा भागातील एका सोसायटीमधील ५ वर्षांच्या मुलावर ३ अल्पवयीन मुलांनीच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. भ्रमणभाषवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलांनी त्याप्रमाणेच कृत्य केले. यामध्ये १३, ११ आणि १० वर्षांच्या ३ मुलांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना कह्यात घेऊन बाल न्याय मंडळात पोलिसांनी उपस्थित केले आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (मुलांवर सुसंस्कार होणे किती आवश्यक आहे ? हे यावरून सिद्ध होते. – संपादक)